Ad will apear here
Next
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव : पालखी नाचवणे, पालखीभेट (व्हिडिओ)


कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षा किती तरी अधिक. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते. या पालख्या का नाचवतात? कशा नाचवतात? होळी कशी आणतात? गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पाहा रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या शिमग्याचा सोबतचा व्हिडिओ... 


बहीण-भावांची भेट म्हणजेच दोन गावांच्या पालख्यांची भेट हादेखील या शिमगोत्सवातील एक अनोखा सोहळा. गावागावातल्या एकोप्याचे प्रतीक असलेल्या हा सोहळा रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावी होतो. पालखीभेटीच्या सोहळ्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत देत आहोत.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZYACK
Similar Posts
५० वर्षांनी कुर्ध्यात पुन्हा रंगले टिपऱ्यांचे खेळ! ऐकताच कानी मधुर मधुर ध्वनी वादन करी हरी प्रेमभरे टिपऱ्या गोपी गोप सारे अशी हरिमाया... कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांच्या वातावरणात सध्या अशा टिपऱ्यांच्या गाण्यांचे स्वर घुमून राहिले आहेत... त्यांच्या सोबतीला आहे टिपऱ्यांचा लयबद्ध नाद, घुंगरांचा किणकिणाट, तबला-पेटीचे
अश्वारूढ तूं श्रीगणेश येसी... आमच्या गावी साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे गणपती घोड्यावर बसून येण्याची परंपरा आहे. त्या निमित्ताने...
पिरंदवणे गावातील पारंपरिक गोकुळाष्टमी उत्सव; वैशिष्ट्यपूर्ण गोफ आणि टिपऱ्या पिरंदवणे (ता. जि. रत्नागिरी) येथील सोमेश्वर मंदिरात होणाऱ्या गोकुळाष्टमी उत्सवाला १६० वर्षांची परंपरा आहे. गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांचं जतन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. यंदा अर्थातच करोनामुळे हा उत्सव होणार नाही. म्हणूनच या उत्सवाच्या आधीच्या स्मृती जागवणारा व्हिडिओ शेअर करत आहोत.
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language